कधीतरी कोणीतरी एखादी रेसिपी विचारते, आपण सहजगत्या सांगतो. कधीतरी कोणीतरी दाद देते की तू तर इतरांना स्वैपाक शिकवायला हवास. आपण हसून विचार मागे टाकतो. मग कधीतरी कोणीतरी मागेच लागते की तुझ्या रेसिपीज लिहून पाठव. थोडेसे व्हाट्स ऍप च्या माध्यमातून चटकन जमतील तेवढ्या शेअर करतो.
पण वारंवार मला पडतो तो प्रश्न हा की विविध खाद्य पद्धतींवर हजारो पुस्तके बाजारात असताना, गूगलच्या माहिती जालात हवी माहिती एका क्लीकसरशी उपलब्ध असताना आपण काही का लिहावे? आणि कोणी ते का वाचावे?
काय नक्की वेगळे आपण देऊ शकतो? नक्की कोणत्या आपल्या अशा हातखंडा पाककृती असू शकतात? पुन्हा पुन्हा करून त्या सिद्ध झालेल्या असायला हव्यात. साधारण स्वैपाक येणाऱ्या कोणालाही सहज ती जशी तशी करता यायला हवी. त्यातल्या खुबी आणि सूचना नीट पोचवता यायला हव्यात. हा विचार मनात ठेवून ज्या थोड्या फार लिहिल्या गेल्या त्या काही आता ब्लॉगवर ठेवत आहे.
या सर्व च्या सर्व महाराष्ट्रीयन त्यातूनही पुण्या- मुंबई कडे बनणाऱ्या, थोड्या कोकणी वळणाच्या, मुक्त हस्ते नारळाचा वापर सुचवणाऱ्या, चिंच गूळ आमसूल वापरून बनवलेल्या.
नेहमीप्रमाणे पाककृती बनवताना फोटो काढणे राहून जाते. ही त्रुटी हळूहळू दूर करेन. या रेसिपीज करून मला तुमचा अनुभव नक्की सांगा.

श्रीखंड
साहित्य : २ लिटर फुल
क्रीम दूध , अर्धा किलो साखर, जायफळ वेलची केशर २ चमचे दूध, २ चमचे दही, बदाम आणि पिस्ता
काप (आवडीनुसार ), एक चिमूट मीठ
कृती :
v दूध कोमट करून
घ्यावे. पूर्ण तापवू नये, साय येता कामा नये.
v त्यास २ चमचे
घट्ट दह्याने विरजण लावावे.
v झाकून उबदार
जागी ठेवून द्यावे. थंडीत जास्त काळजी घ्यावी.
v उन्हाळ्यात
साधारण ४ ते ५ तासात नीट विरजण लागून घट्ट दही बनते तर थंडीत साधारण ८ तास लागू शकतात.
v कोणत्याही कारणाने
दही आंबट होता काम नये.
v दही एका कोरड्या
आणि स्वच्छ मलमल च्या कापडात बांधून टांगून ठेवता येईल अशी पोटली बांधावी आणि खाली
पाणी जमा होत राहील अशी व्यवस्था करून टांगून ठेवावे. साधारण तास भर असे ठेवल्यावर
बरेचसे दह्यातील पाणी निघून जाईल.
v नंतर ही पोटली
एका चाळणीत ठेवून ती चाळणी एका पातेल्यावर ठेवावी आणि हे सारे फ्रीझ मध्ये ठेवावे.
म्हणजे चक्का आंबट होणार नाही.
v साधारण ४ ते
५ तासात पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि घट्ट चक्का तयार होतो.
v ह्या चक्क्यात
साखर मिसळून ठेवावी.
v अर्ध्या ते
एक तासाने, हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे.
v केशर काड्या
२ चमचे कोमट दुधात भिजवून या श्रीखंडात घालाव्यात.
v एक चिमूट मीठ
, पाव चमचा वेलची पूड आणि थोडे जायफळ किसून घालावे.
v सारखे करून
फ्रीझ मध्ये ठेवून गार सर्व्ह करावे.
v आवडत असल्यास
बदाम पिस्ते पातळ काप करून त्यात घालावेत.
सूचना :
§ महत्त्वाची काळजी दही बनवण्यात घ्यावी. ते आंबट होता
काम नये, त्यास तार येता कामा नये.
§ दही थोडे आंबट झाल्यास साखर थोडी जास्त लागेल.
No comments:
Post a Comment