दुधी हलवा:
साहित्य: १ मध्यम आकाराचा कोवळा दुधी, पाव किलो खवा, २ वाट्या साखर,
ड्राय फ्रुटस बारीक तुकडे करून, पाव चमचा वेलची पूड, ७/१० काड्या केशर, २ चमचे साजूक
तूप
कृती:
v दुधी धुवून
त्याचे ४ इंचाचे मध्ये चिरून चार भागात तुकडे करून घ्या.
v कोवळ्या दुधी
मध्ये बिया फारशा असणार नाहीत.
v एका भांड्यात
पाणी ठेवून त्यावर किसणी ठेवून दुधी किसून घ्या. साले टाकून द्यायची.
v पाण्यात ठेवून
किसला की दुधी काळा पडत नाही.
v एका जाड पॅन
मध्ये खवा मंद आचेवर भाजून घ्या रंग न बदलता पण त्याचे तूप सुटले पाहिजे.
v खवा पॅन मध्ये
काढून घ्या.
v पॅन मध्ये असलेल्या
तुपात ड्राय फ्रुटस तळून घ्या.
v त्यावर किसलेला
दुधी घट्ट पाणी काढून टाका
v परतून घ्या,
ते तूप कमी वाटले तर अजून २ चमचे तूप घालून परता.
v ३/४ मिनिटे
झाकण ठेवून वाफ येऊद्या.
v त्यात खवा आणि
साखर घालून नीट शिजू द्या.
v साधारण झाकण
ठेवून १० मिनिटात हलवा शिजेल.
v केशर आणि वेलची
घाला.
v गार झाल्यावर
हलवा अजून थोडा घट्ट होईल त्या हिशेबाने थोडा पातळ वाटला तरी गॅस बंद करून गार होऊ
द्या.
v फ्रीझ मध्ये
गार करून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment