पुरण पोळी
साहित्य: पुराणासाठी - २ फुलपात्री
हरबरा डाळ, २ फुलपात्री चिरलेला गूळ, १ वाटी साखर, १ चमचा तेल, पाव चमचा हळद, अर्धा
चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड, पुरणयंत्र
बाहेरील आवरण: १ फुलपात्र कणिक, अर्धी वाटी मैदा, चिमूट भर मीठ, एक
चिमूट हळद, तेल आणि पाणी, मलमल चे स्वच्छ धुतलेले कापड पूर्ण पोळपाटाला बांधले जाईल
इतके
पोळी लाटण्यासाठी मैदा
कृती:
v डाळ धुवून कुकर
मावेल अशा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यात दुप्पट पाणी, हळद आणि तेल घालून कुकर मध्ये
५/६ शिट्ट्या झाल्यानंतर ५/१० मिनिटे आचेवर डाळ शिजवून घ्यावी.
v हे पाणी कटाच्या
आमटीसाठी वापरतात.
v झाकण निघाल्यानंतर
पाणी काढून डाळ निथळून घ्यावी.
v कोमट झाल्यावर
त्यात साखर आणि गूळ घालून मोठ्या कढईत शिजवण्यास ठेवावे. सतत हलवत राहावे.
v साधारण अर्धा
तास लागेल पुरण शिजण्यास.
v उलथणे उभे राहिले
म्हणजे पुरण शिजले.
v गॅस बंद करून
त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून मिसळून घ्यावे.
v गरम असतानाच
पुरणयंत्रातून बारीक जाळी लावून वाटून घ्यावे. जसजसे गार होईल तसे वाटणे थोडे जड जाते.
v गार होऊ द्या
आणि साधारण मोठ्या मुठी इतके गोळे करून ठेवा.
v एक वाटी मैदा
आणि १ फुलपात्र कणिक एकत्र करा त्यात मीठ आणि हळद घालून बारीक चाळणीतून ३ वेळा चाळून
घ्या.
v तसेच पोळी लाटण्यासाठी
लागणारा मैदा अंदाजे प्रमाणात घेऊन असाच चाळून बाजूला ठेवा.
v परातीत चाललेला
मैदा आणि कणिक घेऊन थोडे तेल आणि थोडे पाणी घालत सैल आणि मऊसूत भिजवून घ्या. हे काम
हळूहळू करायचे आहे एकदा थोडे तेल मग थोडे पाणी घालत ही कणिक भिजवून घ्यायची आहे. एका भांड्यात ही कणिक ठेवून
ती पूर्ण भिजेल इतके तेल त्यावर घालून झाकण ठेवून तासभर मुरत ठेवायची आहे.
v पुरण पोळी करण्यापूर्वी:
v पोळपाटास मलमलचे
कापड पूर्ण बांधून खाली गाठी मारून ठेवा.
v ओटा वर्तमानपत्राने
झाकून घ्या.
v एक मऊ रुमाल
हाताशी ठेवा पोळीची जास्तीची पिठी हलक्या हाताने या रुमालाने काढता यायला हवी.
v एक जाड सपाट
तवा पोळी भाजण्यासाठी ठेवावा.
v कणकेत असलेले
जास्तीचे तेल काढून ठेवावे.
v तवा गरम करत
ठेवा. पुरण पोळी करताना एकसारखी मध्यम आच ठेवायची. सतत कमी जास्त करायची नाही.
v प्रत्येक पोळीसाठी
एका छोट्या लिंबाइतकी कणिक घ्या.
v पोळीला लावण्यासाठी
चालून ठेवलेल्या मैद्यात एका बाजूने बुडवून घेऊन तो डाव्या हातात ठेवा.
v उजव्या हातात
पुराणाचा गोळा घेऊन दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरवत हा उंडा तयार करून
घ्यावा.
v हलक्या हाताने
त्याचे तोंड बंद करावे आणि तो चपटा करून पिठीत सर्व बाजूने बुडवून घ्यावा.
v तयार केलेल्या
पोळपाटास मैदा लावून घ्यावा.
v त्यावर हा पिठी
लावलेला उंडा ठेऊन थोडे थापून घ्या.
v नंतर त्यावर
लाटणे हलक्या हाताने फिरवत पोळी लाटून घ्यावी.
v पोळपाट उचलून
पोळी एका वर्तमानपत्राच्या जाड तुकड्यावर उलटून घ्यावी.
v हलक्या हाताने
खाली लागलेली जास्तीची पिठी काढून टाकावी आणि पोळी तव्यावर टाकावी.
v साधारण एका
बाजूने भाजली गेली कि तवा गॅस वरून काढून वर्तमानपत्राच्या तुकड्यावर तवा तिरका करून
काढून घ्यावी.
v वर्तमानपत्र
उचलून पुन्हा दुसरी बाजू तव्यावर भाजण्यास टाकावी.
v दुसरी बाजू
भाजली गेली की पुन्हा तवा गॅस वरून उचलून तिरका करून एका मोठ्या वर्तमानपत्रावर गार
होण्यास ठेवावी किंवा साजूक तुपासोबत गरम गरम वाढावी.
§ ह्या पोळीला
उलथणे लावायचे नाही.
§ अतिशय नाजूक
आणि मऊसूत असते त्यामुळे खूप जपून हाताळावी लागते.
§ साधारणपणे ५/७
दिवस टिकते. यात साधारणपणे २० पोळ्या होतात.
No comments:
Post a Comment