गुळाची पोळी
साहित्य: अर्धा किलो बारीक किसलेला गूळ, अर्धी वाटी तीळ - भाजून पावडर
करून, चार चमचे खसखस भाजून पावडर करून ५/६ चमचे तेल, ४ चमचे चणा डाळीचे पीठ, अर्धा
चमचा वेलची पूड, एका हरबऱ्या इतका ओला खाण्याचा चुना.
वरची पारी: १ भांडे कणिक, एक भांडे मैदा, एक चिमूट मीठ, ४ चमचे तेल.
पोळी लाटण्यासाठी थोडा मैदा
कृती:
v गूळ किसून घ्यावा.
v तीळ आणि खसखस
भाजून बारीक पावडर करून घ्यावी आणि गुळात मिसळावी.
v तेल तापवून
त्यात डाळीचे पीठ घालून खरपूस भाजून घ्यावे.
v हे मिश्रण गरम
असतानाच गुळावर घालून चमच्याने हलवून घ्यावे.
v गार झाल्यावर
त्यात खाण्याचा चुना आणि वेलची पूड घालून चांगले मळून मोठ्या लिंबातून थोडे मोठे गोळे
करून ठेवावे.
v कणिक आणि मैदा
एकत्र करून घ्यावा. मीठ घालावे.
v तेल गरम करवून
कणकेत घालून ते सर्व कणकेला चोळून घ्यावे.
v त्यात जरुरी
प्रमाणे पाणी घालून घट्ट भिजवून सुमारे अर्धा तास ठेवावी.
v कणकेचे प्रत्येक
पोळीसाठी दोन छोटे गोळे करावेत.
v एक साधारण गूळ
इतका आणि एक त्याहून थोडा लहान.
v त्याच्या छोट्या
लाट्या लाटून घ्या. एक लहान एक मोठी.
v मोठ्या पारी
वर गुळाची गोळी चपटी करून त्यावर ठेवावी आणि त्यावर लहान पारी ठेवून कडेने सगळ्या बाजूने
बंद करून घ्या.
v थोडया मैद्यावर
पोळी पातळ लाटून घ्या.
v नॉनस्टिक तव्यावर
दोन्ही बाजूने खरपूस भाजून गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
§ चुन्यामुळे
गूळ पोळीच्या बाहेर येत नाही.
§ पोळी खुटखुटीत
कडक झाली पाहिजे.
§ कणिक घट्ट भिजवली
गेली नाही तर पोळी मऊ पडेल आणि त्याचे तुकडे पडतील.
§ या पोळ्या साधारण
आठ दिवस टिकतात.
No comments:
Post a Comment