।। श्री ।।
कहतें हैं के खाना यादोंमें बसता हैं |
किती खरे आहे ना हे! दर दिवशी चवीचवी चे पदार्थ चाखत असतानाही एखाद्या साध्या सोप्या पदार्थाची चव मनात रेंगाळत राहणे. कित्येकदा आपण नव्याने बनवलेला एखादा उत्तम जमलेला पदार्थ पुन्हा न केल्याने विस्मृतीत जाणे, अचानक आठवणींच्या पोतडीतून बाहेर येणे, आणि अरे! मी कसा विसरले हा पदार्थ भाव मनात उमटणे. घरी लोणी काढवायला ठेवले कि पुरणपोळीचा सुगंध मनात दरवळणे, पाऊस पडताच भजी आठवणे, सलग काही दिवस घराबाहेर राहावे लागले की कधी एकदा घरी जाऊन वरण भात तूप लिंबू असे जेवण जेवायला मिळते असे होणे.... आणि असे बरेच काही!
चव जिभेला समजते पण त्याहून अधिक ती मनात वसते. चव आणि तिची आठवण जोडलेली असते प्रसंगांशी, व्यक्तींशी, काही क्षणांशी, विशिष्ठ जागेशी. म्हणूनच आईच्या हातचे रव्याचे लाडू, सासूबाईंच्या हातची पुरणपोळी, आत्याच्या हातची सुरळीची वडी, मामीच्या हातच्या पाकातल्या पुऱ्या यांची मनातली चव कायम असते. सिंहगडावरील ताक किंवा झुणका भाकरी, नरसोबाच्या वाडीची बासुंदी, कोल्हापूर मधे मिळणारी मिसळ किंवा आईस्क्रीम, हे किंवा यासारख्या काही मनात वसलेल्या चवी ज्या जागेशी संबंधित, आपणच दिलसे कोणा खास व्यक्तीसाठी खास प्रसंगी आधी अनेकदा बनवलेला एखादा पदार्थ, एवढेच नव्हे तर एखाद्या दुःखद प्रसंगी कित्येक तासाच्या ताणानंतर, शेजाऱ्यांनी रितीने आणून दिलेला पिठले भात, तशाही प्रसंगात मनाने छान चवीची घेतलेली नोंद ... अशी अनेक उदाहरणे! इसलिये कहतें हैं के खाना यादोंमें बसता हैं! Food is all about memories!
तर हा एक छोटासा प्रयत्न्न.... माझ्या अशा खाण्यासंबंधीच्या असंख्य आठवणी, वेगवेगळे प्रसंग, व्यक्ती, घटना किंवा जागेशी जोडल्या गेलेल्या. जेवण, खाणे जे मी खरेतर खूप "दिल से " करते. अनेक प्रयोग करत राहते, कधी घडतात कधी बिनसतात. हा प्रयत्न्न त्यांना तुमच्यासमोर आणण्याचा. पदार्थ साधेच असतील किंवा नेहमीचे असतील सोबतची आठवण खास असेल, कधी छोटासा बदल करून बघत चव वेगळी आणि छान बनवायचा प्रयत्न्न केलेला असेल. कधी पदार्थ त्याच्या बनवण्यातल्या खाचाखोचांसह पेश केलेला असेल. या खाद्य सफरीत एखादी हलकेच हसू आणणारी मजेशीर आठवण असेल, स्वतःची करून घेतलेली फजिती असेल, कधी फोटो असतील कधी नसतील पण जे तुमच्या समोर ठेवले जाईल ते मात्र "दिलसे" असेल!
आपल्या प्रिय व्यक्तीला आवडणारे खाण्याचे पदार्थ सवयीने किंवा प्रेमाने कालांतराने आपल्यालाही आवडू लागतात. माझ्याबाबत अशी पदार्थांची एक यादीच आहे, पुरणपोळी, कॅरॅमल पॉपकॉर्न, फणसाची सांदणे, साबुदाण्याची खिचडी ....... खिचडी कढी हा तसाच काहीसा एक पदार्थ माझ्यासाठी. फारशी मुगाची खिचडी न आवडणारी मी कधी हे स्वतः आवडीने खाऊ लागले ते माझे मलाही कळले नाही. आवडू इतके लागले की आज मला या ब्लॉग ला नाव देण्यासाठी ही तेच नाव योग्य वाटले.
पदार्थ स्वतः बनवून आपल्या जवळच्या व्यक्तीस बनवून खिलवण्यातला आनंद निराळाच! त्यातून त्या व्यक्तीची तात्काळ "वाह " ही दाद मिळणे किंवा तिच्याशिवायही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तृप्त भाव उमटणे यासारखा दुसरा आनंद नाही. हाच आनंद मला virtual जगातून मिळेल तुमच्या प्रतिक्रियांमधून म्हणूनच संवादाचा पूल कायम ठेवून ही खाद्ययात्रा तुमच्या सोबतीने करायचा हा मानस!

No comments:
Post a Comment