साहित्य : - ३ मोठे
डाव कणिक, पाव
चमचा मीठ, तेल,
पाणी, १ चमचा दही
कृती : - एका गोल
पसरट भांड्यात कणिक
घ्या. शक्यतो चाळू
नका कारण पीठातून
कोंडयावाटे फायबर्स निघून जाऊ
नयेत.
त्यात मीठ आणि
दही घालून मिसळून
घ्या.
गरजेनुसार पाणी हळूहळू
घालत कणिक भिजवून
घ्या.
रोजच्या पोळ्यांची कणिक ही फार घट्ट
अथवा फार सैल असता कामा
नये.
योग्य घट्ट भिजवल्यावर
साधारण २/३ चमचे तेल
घालून छान मळून
घ्या. हाताला किंवा
भांड्याला कुठेही कणिक
चिकटून न राहणे ही कणिक
नीट भिजली गेल्याची
खूण आहे.
पोळ्या करण्यापूर्वी साधारण अर्धा
तास अशी कणिक
भिजवून ठेवणे उत्तम.
पोळी लाटण्याआधी पुन्हा एकदा
कणिक नीट तिंबून
घ्या.
मोठ्या लिंबापेक्षा थोडे मोठे
असे एकसारखे गोळे
करून घ्या.
ताव तापत ठेवा.
पिठी म्हणून लावण्यासाठी
शक्य असल्यास तांदूळ
पिठी घ्या. म्हणजे
पोळी लाटताना सरसर
सरकते. नसल्यास गव्हाचे
पीठ ही चालू शकते.
गोळा पुरीएवढा लाटून घ्या.
त्यावर तेलाचा हात
फिरवून थोडी पिठी
भुरभुरावा.
मधे घडी घालून
पुन्हा तेलाचा हात
आणि त्यावर पिठी
घालून अजून निम्यात
घडी घाला.
आधी अर्धगोल आणि नंतर
पाव- गोल अशी घडी होईल.
ही पोळीची घडी
पिठीत घोळवून पुन्हा
लाटायला सुरुवात करा.
सुरुवातीस तिन्ही कडा
लाटून गोल आकार
द्या.
आता पुन्हा साधारण
गोल आकाराची जाड
पोळी होईल.
आता कडकडून लाटत
पोळी मोठी लाटून
घ्या. साधारण डावीकडून
उजवीकडे गोल अशारितीने
लाटावी.
सर्वात शेवटी मधून
एकसारखी करून घ्यावी.
योग्य तापलेल्या तव्यावर पोळी
टाकून २/४ सेकंदात उलटावी.
दुसरी बाजू नीट
भाजून घ्यावी. पुन्हा
पोळी उलटून भाजून
घ्यावी. यावेळी पोळी
फुगेल आणि तिचे
पदर सुटतील.
कणिक
योग्य रितीने भिजवली
असेल आणि नंतर
नीट लाटली असेल
तर पोळी मऊसूत,
टम्म फुगलेली आणि
पदर सुटलेली होते.
अशी पोळी पूर्ण
दिवस चांगली राहते.
कडक किंवा चामट
न होता. दही
घातल्याने पोळी अजून
मऊ बनते.
No comments:
Post a Comment