कंफर्ट फूड चा जमाना आहे. सध्याचा पावसाळी मौसम जरी चटपटीत खाण्याची इच्छा निर्माण करणारा असला तरी अशा एखाद्या खाण्यानंतर हे पोटासाठी फार ठीक नाही ही जाणिव ही होतेच. धुवांधार पावसाचे दिवस, त्यातून इतर काही प्लॅन नसलेला वीकेंड. पण ऑफिसचे काम संपवायचे आहे हे मनात आहेच. फक्त रोजच्याप्रमाणे तयार होऊन ऑफिसला न जाता घरूनच पूर्ण दिवस काम करायचे आहे हे नक्की केले आहे. जेवण आणि इतर नित्याची सर्व कामे मागे टाकून दिवसभर ऑफिसच्या कामात स्वतःला बुडवून घेतले. चहा, कॉफी, ओट्स आणि ब्राउन ब्रेड आणि चीझस्प्रेड हे पदार्थ गेला आठ दहा तास पोटाचा आधार होते.
चहाचा पहिला कप घेऊन लॅपटॉप समोर अवतरले. सोबतीला जुनी हिंदी गाणी पुरेसा कामाचा मूड, गरजेपुरतेच मधेमधे जागेवरून उठून पुन्हा सुरु केलेले काम. तसेही सुट्टीच्या दिवशी जास्त चांगले काम होते हा माझा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. स्काईपवर कोणी बोलायला विचारायला येत नाही. कोणी डिस्टर्ब करत नाही. संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरेसे आणि मनाजोगते काम झाले आहे याची जाणिव समाधान देणारी आहे. लॅपटॉप बंद करून आता खरा वीकेंड सुरु झालाय आता पुढे काय करायचे हा विचार !
टेरेसमधून बाहेर डोकावले तर धों धों पाऊस कोसळतोय. तसे माझे आणि पावसाचे फार जवळचे नाते नाही. त्यामुळे गरज नसताना मी मुद्दाम भिजण्याची मजा घेण्यासाठी एकटीच बाहेर पडणे हे निव्वळ अशक्य. त्यामुळे मी बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्बभवत नाही. कुंडीतून गवती चहा ची एक पात घेऊन स्वतःसाठी मस्त चहा बनवून घेत, पावसाला बघत चहा घेऊन उरलेल्या वेळेचे काय करायचे हा विचार मनात. मस्त चहाने मूड अजून छान केलाय. शेवटी ठरले असे की आधी थोडा वेळ घरावरून आवश्यक त्या साफसफाई साठी हात फिरवायचा. मग मस्त फ्रेश होऊन देवपूजा आणि नंतर छानसे जेवण बनवून स्वतःलाच खुश करायचे. त्यानंतर जमले तर एखादा सिनेमा बघायचा.
छानसे जेवण म्हणजे माझ्या दृष्टीने अनेकदा साधे, सकस ताजे बनवलेले आणि वाफाळते गरम असे असते. अनेक पदार्थ जे ही माझी अट पुरी करतात. जसे की साधा वरण भात तूप लिंबू, पुलाव आणि टोमॅटो सार, इडली सांबार, लोणी थालीपीठ, सूप आणि सलाड किंवा सूप आणि गार्लिक ब्रेड, खिचडी कढी आणि पापड, घरी बनवलेला भरपूर भाज्या घातलेला पास्ता, जास्त प्रमाणात भाज्या घालून केलेला पराठा, अगदीच सोपा म्हणजे तांदूळ आणि मूग डाळ भरपूर पाण्यात शिजवून त्या पाण्यासकट मिक्सितून फिरवून त्यात मीठ जिरेपूड आणि साजूक तूप चालून गरम गरम पिणे ..... असे अनेक. आज हा मला खुश करण्याचा मान मिळालाय खिचडी, कढी आणि पापड यांना.

No comments:
Post a Comment